अध्यक्षीय मनोगत....!

About Images

आपण सर्वांच्या सहकार्याने पुणे जिल्हा कुस्तीगीर यशस्वी वाटचाल करीत आहे. पुणे जिल्ह्यातील कुस्तीगिरांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी होता यावे यासाठी विविध स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करत आहे.

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या यशस्वी योजना

1) पुणे जिल्ह्याची विभागणी करून पूर्व, पश्चिम व उत्तर अशा तीन विभागीय समित्यांची स्थापना करून सर्वांना संघटनेत सामाऊन घेण्याचा प्रयत्न आहे

2) कुस्तीगीर, पंच, मार्गदर्शक व स्ंयोजक, यांच्यासाठी निमंत्रित कुस्ती स्पर्धाकरिता आचार स्ंहिता तयार करून त्याची अंमल बजावणी करण्यात येत आहे.

3) पुणे जिल्ह्यातील नवोदित कुस्ती पंचानसाठी पंच प्रशिक्षण वर्ग घेऊन त्यांना अद्यावत करण्याचा प्रयत्न करत आहे.

4) पुणे जिल्ह्याबहेरील मल्लास पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळण्यास रोखण्यासाठी व खोटी वजने देऊन होणारा सहभाग रोखण्यासाठी कुस्तीगिरांना ओळखपत्र देण्याचे काम सुरू आहे.

5) पुणे जिल्ह्यातील पैलवान मार्गदर्शक, पंच, कुस्ती संघटक यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी, गतवर्षी पासून चार जिल्हा स्तरीय पुरस्कार सुरू करण्यात आले आहे. तसेच स्व. पै. माऊली काशिद यांच्या नावनेया वार्षिपासून नवोदित होतकरू मल्ल हा पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप 21000 रु. रोख व मानचिन्ह असे राहील.

6) 14 वर्षाखालील मल्लांसाठी 25, 28, 32, 35, 38 व 42 या वजन गटामधे जिल्हास्तरीय स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत.

7) पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने गुणवंत मल्लांना जानेवारी 2018 पासून मासिक मानधन सुरू करण्यात आले आहेत.

8) पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या छताखाली पुणे जिल्ह्यातील सर्व पैलवान एकत्र यावेत या उद्देशाने पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाने निमंत्रित सभासद अभिनव योजना सुरू केली असून पुणे जिल्ह्यातील जे पैलवान पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे निमंत्रित सभासद होतील त्यांना पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सर्व मीटिंगला उपस्थित राहाता येईल आणि आपले मत मांडता येईल.

9) पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाने आपली वेबसाईट सुरू केली असून पुणे जिल्हयातील कुस्तीचा सर्व इतिहास व चालू घडामोडी कुस्ती प्रेमींना पाहता येईल. तसेच या पूढील शेकडो वर्षांचा इतिहास संग्रहीत राहील.

या पुढील काळातही कुस्ती क्षेत्रासाठी खूप काही करावयाचे आहे. फक्त गरज आहे तुमच्या सहकार्याची व आशिर्वादाची

आपला
पै. संदीपअप्पा भोंडवे